रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. ( Ajit Pawar Has Decided Not To Celebrate His Birthday This Year In Wake Of Raigad Landslide )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. परंतू गुरुवारी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांबाबत खासदार बारणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर
– मोठी बातमी! लोणावळा शहरात हंगामातील विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 273 मी.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Update