तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नवलाख उंब्रे येथील जाधववाडी धरण इथे पूरजन्य परिस्थिती, आपातकालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला होता.
सदर कॅम्पमध्ये वन्यजीवन रक्षक मावळ संस्था यांनी ॲम्बुलन्स बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आलेला आहे. एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे, ह्याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच नागरिकांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आलेला आहे. ( Demo camp on disaster management at Jadhavwadi dam in Talegaon MIDC police station limits )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्या प्रसंगी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासोबत इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टीमचे अध्यक्ष गणेश निसाळ, भास्कर माळी, जीगर सोळंकी, सर्जेस पाटील, विनय सावंत, शुभम काकडे, सार्थक घुले, गणेश गायकवाड, अविनाश कार्ले, गणेश सोंडेकर, विकी दौंडकर, कुणाल दाभाडे, श्रीयस भेगडे, सुरज शिंदे, प्रशांत शेडे, गौरव चेपे, गणेश ढोरे उपस्थित होते. डेमो कॅंप करण्याची तळेगाव दाभाडे MIDC पोलीस यांनी संस्थेला संधी दिल्याबद्दल रेस्कु टीम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील वाहतूक समस्येवर निर्णायक तोडगा काढा! शहर भाजपाचे पोलिसांना निवेदन
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांबाबत खासदार बारणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर