रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर 20 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली. ह्या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे. तर अद्यापही शोधकार्य आणि मदतकार्य सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर डोंगर दऱ्यांचा तालुका असलेल्या मावळ तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले असून स्वतः तहसीलदार यांनी गुरुवारी तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी केली. ( After Raigad Irshalwadi Landslide Maval Taluka Administration Get Alert Inspection Of Landslide Prone Villages By Tehsildar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज तुंग, माळवाडी, माऊ गबाळेवस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी, आदी दरडप्रवण धोकादायक ठिकाणी तहसीलदार विक्रम देशमुख, बांधकाम खात्याचे उपअभियंता धनराज पाटील, शाखा अभियंता श्रीनिवास पांचाळ, विस्तार अधिकारी बाळासाहेब वायकर, माणिक साबळे यासह अन्य शासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.
“मावळातील काही ठिकाणे धोकादायक आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच काही परिस्थिती जाणवली, तर काही कुटुंबांना शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासकीय कंट्रोल रूम करण्यात आला आहे. तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. एखादी आपत्तीची घटना घडल्यास सरपंच, पोलिस पाटील किंवा तलाठी सर्कल यांनी त्वरित कंट्रोल रूमला कळवायचे आहे. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पावसाळा संपेपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
अधिक वाचा –
– ‘या वर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही’, कार्यकर्त्यांनाही आवाहन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला निर्णय
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांबाबत खासदार बारणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर