तळेगाव स्टेशन काँग्रेस (आय) कमिटीच्या महिला उपाध्यक्ष पदी संगीता दुबे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता दुबे ह्या तळेगाव स्टेशन परिसरातील स्त्री शक्ती भाजी मंडईच्या अध्यक्षा आहेत. तर, तळेगाव स्टेशन काँग्रेस (आय) कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी योगेश पारगे यांची निवड करण्यात आली आहे. योगेश पारगे तळेगाव स्टेशनमधील संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ( Appointment Of New Office Bearers Of Maval Taluka Congress Party Has Been Announced )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर सांगितले. संगीता दुबे यांना मावळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा हिरे यांच्या हस्ते तर, योगेश पारगे यांना मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ आणि जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
ह्याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, काँग्रेस नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तिकोणे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मुळशी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, मुळशी धरणात तब्बल ‘इतका’ पाणीसाठा । Mulshi Taluka News
– धो…धो…धो पाऊस अन् पवना धरण पन्नाशीच्या पार । Maval Rain News