पवनानगर : वारु ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरिभाऊ निंबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वारु ब्राम्हणोली ग्रामपंचायतीचे सरपंच पद ग्रामस्थांच्या वतीने एकविचाराने विभागून देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जाखमाता पॅनेलने घेतला होता. परंतू ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आणि हा अविश्वास मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. ( Haribhau Nimble Elected Unopposed Sarpanch of Varu Bramhanoli Group Gram Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी हरिभाऊ निंबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी उपसरपंच उज्वला शिंदे, सुनिता निंबळे,निलम साठे,वृषाली निंबळे, बाळासाहेब काळे,वसंत काळे, शाहिदास निंबळे आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल कोकरे, तलाठी शिंदे यांनी काम पाहिले.
हरिभाऊ निंबळे यांच्या सरपंच पदी निवडीनंतर ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना हरिभाऊ निंबळे म्हणाले की, “उर्वरित काळात वारु ब्राम्हणोली दोन्ही गावांतील नागरिकांना व सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त विकामकामे करण्यावर भर दिला जाईल.”
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळा शहरात शालेय साहित्य आणि फळे वाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा
– धो…धो…धो पाऊस अन् पवना धरण पन्नाशीच्या पार । Maval Rain News