मराठी – हिंदी कलाविश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. सावरकर यांनी मराठी रंगभूमावरुन अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली होती. हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांतील नाटके, चित्रपट यांत त्यांनी भुमिका साकारल्या. शेकडो नाटके आणि चित्रपटात जयंत सावरकर यांनी काम केले असून त्यातील अनेक भुमिका अजरामर करुन ठेवल्या आहेत. मराठी चित्रपटातील आजोबा किंवा ज्येष्ठ पात्रांच्या भुमिका त्यांनी अत्यंत चोखपणे निभावल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जयंत उर्फ अण्णा सावरकर यांचे ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. ( Veteran marathi actor Jayant Savarkar passes away at the age of 88 )
‘एकच प्याला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘कथा नव्या संसाराची’ या नाटकांमधील जयंत सावरकर ह्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील त्यांनी साकारलेला अंतू बर्वा आजही आठवतो. दरम्यान ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये ते दिसून आले.
सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या अलीकडच्या कामांविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली.
अधिक वाचा –
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप
– Breaking! मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर घाटात दरड कोसळली, तब्बल साडेतीन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद