भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवाशक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” ह्यांच्या वतीने भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्यास तसेच आपल्या वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्तीचा वारसा येणाऱ्या पिढीला बहाल करण्याच्या हेतूने आषाढी एकादशी योगी “श्री बाल माऊली वेशभूषा संमेलन (ऑनलाईन)” आयोजित करण्यात आले होते. या अभिनव संकल्पनेस शेकडो बाल माऊलींचा उस्फुर्त सहभाग लाभला जो वाखाणण्याजोगा होता.
नियोजित संमेलनाच्या माध्यमातून समितीने मुलांनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी श्रीयांश सावळे (वडगावशेरी, पुणे), शिवांश साबळे (सोमनाथनगर, पुणे), कियांश कडू (नांदेड सिटी, पुणे), रियांश ढेरे (कात्रज, पुणे) यांस प्रमुख चार पारितोषिके आणि अद्वित चौधरी (वाघोली, पुणे), दक्ष दरेकर (होळकरवाडी, पुणे), श्रीयान कुलकर्णी (उबाळेनगर, पुणे), प्रांशुल घाडगे (हडपसर, पुणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली गेली.
मुलींनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी रूही इथापे (मु.पो. रावणगाव, पुणे), सारा पाटील (नांदेड सिटी, पुणे), ध्रुवी गलांडे (वडगांवशेरी, पुणे), ओवी निलेश कोकणे (मंचर, पुणे) यांस प्रमुख चार पारितोषिके आणि अन्वी रामदिन (सदाशिव पेठ, पुणे), जिजा जोशी (न्यु वैशाली नगर, नंदुरबार), मायरा कर्देकर (लाडघर, रत्नागिरी), सात्विका खांदवे (लोहगाव, पुणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर केली.
लाखो वारकरी ज्यांच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून शेकडो मैल चालत जातात, अशा श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या भक्तीने संक्रमित समितीतील सदस्यांच्या आदिरा राजेश बोराडे (चंदननगर, पुणे), आद्विक विजय भांबुरे (राजगुरूनगर, पुणे), पार्थ प्रवीणकुमार ढेरे (चिंचवड, पुणे), राजवी गौरव पवार (धायरी, पुणे) या सर्व बाल माउलींनाही उत्कृष्ट वेशभुषेबद्दल गौरविण्यात आले.
या संमेलनासाठी उत्स्फुर्त सहभाग दर्शविल्या बद्दल सर्व नोंदणीकृत बाल वारकऱ्यांना समितीच्या वतीने आकर्षक ऑनलाईन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व विजेत्यांना एका छोटेखानी कार्यक्रमातून जाहीर झालेली सर्व पारितोषिके समितीच्या मानद सदस्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
आपल्या पाल्यास आयुष्यातील पहिलेच पारितोषिक प्राप्त झाल्याने कित्येक लहान माऊलींच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या अतुल्य संधिबद्दल सर्वांनी समितीप्रती ऋण व्यक्त करण्याची इच्छाही बोलून दाखविली. समितीच्या या कार्यक्रमास अतिशय उत्साहाने भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पाश्चात्य संस्कृतीतील फ्री रिलेशनशीपच्या प्रभावाने देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे – उच्च न्यायालय
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख