व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद बातमी! आतवण सोसायटीचे विद्यमान चेअरमन मारुती टाकवे यांचे निधन । Dainik Maval News

त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 29, 2023
in लोकल, ग्रामीण
Atvan-Society-maval

Photo Courtesy : Santosh Kadu


आतवण – आपटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मारुती कुमा टाकवे ह्यांचे शुक्रवारी (दिनांक 28 जुलै) रोजी दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

कै मारुती टाकवे हे मागील 15 वर्षांपासून आपटी सोसायटीचे संचालक – चेअरमन म्हणून कार्यरत होते. तसेच कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सहकाराची पेरणी केली होती. शुक्रवारी त्यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण पंचक्रोशीतून शोक व्यक्त होऊ लागला. वयाच्या 83 व्या वर्षी मारूती टाकवे ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज (शनिवार, दिनांक 29 जुलै) रोजी राहत्या गावी आतवण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

मारुती टाकवे ह्यांच्या पश्चात पत्नी 2 हिराबाई मारुती टाकवे आणि सखुबाई मारूती टाकवे, मोठी मुलगी कलाबाई संपत कडू, लक्ष्मण मारुती टाकवे, अंकुश मारुती टाकवे, लहू मारूती टाकवे, संगीता भाऊ ढोरे, अंजना राम बोडके, विठ्ठल मारुती टाकवे, शिवाजी मारूती टाकवे, अलका मोहोळ, भिवा मारुती टाकवे असा मोठा परिवार आहे.

‘सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि सर्वांवर माया लावणारे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले. त्यांच्याकडून नेहमीच काहीना काही शिकायला मिळाले. सोसाटीच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी अनेक चांगली कामे केली. त्यांच्या निधनाचा धक्का बसला असल्याची’ प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते संतोष कडू ह्यांनी दैनिक मावळला दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News
– हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या, खासदार श्रीरंग बारणेंची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी
– युवकांनो सावधान..! सोशल मीडिया मार्केटिंगच्या बहाण्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

 


Previous Post

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध; वडगाव मावळ शहरात ट्रायबल फोरमकडून भव्य मोर्चा

Next Post

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें! परंदवडी इथे तब्बल 8000 वृक्षांची लागवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tree-Plantation

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें! परंदवडी इथे तब्बल 8000 वृक्षांची लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.