व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

युवकांनो सावधान..! सोशल मीडिया मार्केटिंगच्या बहाण्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

मार्केटिंगच्या बहाण्याने एका तरुणाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 28, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Instagram

File Image


मार्केटिंगच्या बहाण्याने एका तरुणाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. दिनांत 16 जुलै ते 19 जुलै दरम्यान गहुंजे येथील लोढा बेलमांडो सोसायटीत हा प्रकार घडला. आनंद गिरिजाशंकर नगायेच (वय 35, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी याबाबात सोमवारी (दिनांक 24 जुलै) रोजी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्‍ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद याच्या व्हॉटस्‌अप नंबरवर एक मेसेज आला, ज्यात ‘मी के मार्केटिंग एजेन्सीमधून तुम्हाला मेसेज केला असून आम्ही लोकांना फ्री ऑनलाइन नोकरीसाठी ऑफर देत आहोत. आम्ही सोशल मीडिया मार्केटींगचे काम करत असून, आमची कंपनी तरुण मुलांना इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोव्हर्स वाढवण्यासाठी मदत करते. तसेच, आमचे काम फक्त इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करणे आणि प्रत्येक अकाउंटला फॉलो केल्यावर तुम्हाला आम्ही 70 रुपये देणार आहोत. एका दिवसात तुम्ही लोकांना फॉलो करून तुम्ही 24 हजार रुपये कमवू शकता.

त्यानंतर, आरोपीने फिर्यादी यांना डेमो तीन अकाउंटचे डेमो दाखवतो, असे सांगत फिर्यादी यांना इंस्टाग्राम अकाउंटच्या लिंक फॉलो करण्यासाठी पाठविल्या. तसेच, फॉलो केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट मला पाठवा आम्ही तुम्हाला लगेचच 210 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवितो. त्यानंतर फिर्यादी यांनी तीन इंस्टाग्राम अकाउंटच्या लिंक फॉलो केल्या. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना एक फॉर्म पाठविला व त्यामध्ये त्यांचे नाव, वय, कामाचा अनुभव, बँकेचा अकाउंट नंबर ही माहिती भरून पाठवण्यास सांगितली. माहिती पाठविल्यावर ऑनलाइन व्यवहार करून फिर्यादी यांना वेळोवेळी पैसे पाठवण्यास भाग पाडून त्यांची सोशल मीडिया मार्केटिंगच्या नावाखाली एकूण 10 लाख 85 हजार 250 रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ सदर प्रकरणाचा पुडील तपास करत आहेत. ( 11 lakh fraud of youth on pretext of social media marketing case registered at Shirgaon Police Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

कामशेतमध्येही प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन, जाणून घ्या केंद्राचा पत्ता आणि माहिती

Next Post

हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या, खासदार श्रीरंग बारणेंची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne

हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या, खासदार श्रीरंग बारणेंची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.