व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत

दिवासी आश्रम शाळेतील मुलांची शारीरिक वाढ चांगली व्हावी. त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. हा यामागचा हेती होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 26, 2023
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
Sevadham-Trust-Ashram-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील सेवाधाम आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पी.एफ.सी. क्लब पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथिनयुक्त आहाराचे वाटप करण्यात आले. आदिवासी आश्रम शाळेतील मुलांची शारीरिक वाढ चांगली व्हावी. त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. म्हणून शाळेतील विद्यार्थांना पी.एफ.सी. क्लब पुणे यांच्याकडून 100 लिटर दूध, तूरडाळ 100 किलो, सोयाबीन 100 किलो, शेंगदाणे 50 किलो या प्रकारचे प्रथिनयुक्त साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले. ( Hope For The Children Foundation Gave Huge Food Grains To Students Of Sevadham Trust Ashram School In Maval Taluka )

यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याद्यापक भोर सर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे समुदाय विकास समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी केले. तसेच, विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य कसे ठेवावे, या संदर्भात पी.एफ.सी. क्लबचे यश राठोड यांनी मार्गदर्शन केले. ह्यावेळी पी.एफ.सी. क्लबचे मान्यवर चिराग, अनिकेत, अंकित, सतेज, आदिश आणि शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज राहतो. यात कातकरी, ठाकर आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. वर्षानूवर्षे डोंगर – दऱ्यात राहणारा हा घटक आता कुठे हळूहळू मुळ प्रवाहात येऊ लागला आहे. शासनाकडून त्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही म्हणावे तसे सामाजिकरण ह्या घटकाचे अद्याप झालेले नाही. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा ह्या सर्व बाबी आदिवासी समाजापर्यंत पोहोचाव्यात ह्यासाठी एकट्या सरकारचे प्रयत्न पुरेसे पडणार नाहीत, अशावेळी समाजसेवी घटक, एनजीओ यांचाही ह्यात हातभार असणे आवश्यक आहे. सद्यमितीला मावळ तालुक्यात अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या होप फॉर दि चिल्ड्रेन संस्थेकडून मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील आदिवासी समाजासाठी मदतकार्य केले जात आहे. ( Hope For The Children Foundation Gave Huge Food Grains To Students Of Sevadham Trust Ashram School In Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
– सावित्रीच्या लेकींनी घडवला इतिहास! दारुंब्रे शाळेचे नाव जिल्ह्यात गाजवले, आई-वडील अन् शिक्षकांच्या आनंदाला उधाण


Previous Post

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून मिळणार पुरस्कार; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, जाणून घ्या

Next Post

‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

'तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू...', वाचा काय आहे प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.