व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करा – आमदार सुनिल शेळके

आमदार सुनिल शेळके यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मागणी.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
mla-sunil-shelke

File Image - mla sunil shelke


वडगाव मावळ : अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करा. या गावांचा गांभीर्याने विचार करुन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार सुनिल शेळके यांनी अधिवेशनात (गुरुवार दि.२७ जुलै) मांडली.

आमदार शेळके म्हणाले की, यापूर्वी माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये मावळातील अनेक गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला होता. या सर्वेक्षणानुसार मावळ तालुक्यातील भुशी, बोरज,ताजे,गभाले वाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग,मालेवाडी, लोहगड,पाले ना.मा.,नायगाव, साई, वाउंड,कल्हाट, सावळा, टाकवे खु., शिलाटणे,सांगिसे,नेसावे इ.गावांमध्ये भुस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. तर बोरज,माऊ,भुशी, कळकराई, मालेवाडी,तुंग,लोहगड आणि ताजे ही आठ गावे अतिसंवेदनशील असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे.

अशा धोकादायक ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त कुटुंबियांना भरपाई देण्यात येते. तेथील वाडी-वस्तीचे, गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार होतो. परंतु एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी आधीच पावले उचलण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष न करता हा धोका गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.”

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात विविध प्रलंबित प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे भूस्खलनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मावळ तालुक्यातील अनेक गावांना धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळातील संवेदनशील गावांमधील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्या गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावयाच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात. परंतु यावर योग्य निर्णय घेऊन कायमचा तोडगा काढला गेला पाहिजे. ( MLA Sunil Shelke demanded that measures should be taken in villages prone to landslides in Maval taluka In assembly session )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत


dainik maval jahirat

Previous Post

‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

इंदोरी इथे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचे उद्घाटन, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंसह शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pradhan-Mantri-Kisan-Samriddhi-Kendra

इंदोरी इथे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचे उद्घाटन, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंसह शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.