मणिपूर राज्यात सुरु असलेला हिंसाचार आणि या हिंसाचारादरम्यान महिलांवर होत असलेले अत्याचार ह्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ शहरात शुक्रवारी ट्रायबल फोरम यांच्याकडून जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आणि तालुक्यातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागील 80 दिवसांहून अधिक काळ मणिपूर राज्यात हिंसाचार सुरु आहे. ह्याच हिंसाचारादरम्यान महिलांवरील अत्याचाराचा एक भयंकर व्हिडिओ संपूर्ण देशभर व्हायरल झाला होता. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक आक्रोश व्यक्त करत आहेत.
शुक्रवारी, दिनांक 28 जुलै वडगाव शहरात मणिपूर इथे घडलेल्या आदिवासी माता-भगिनी अत्याचार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय वडगाव मावळ असा मोर्चा काढण्यात आला. अखेरीस तहसीलदार विक्रम देशमुख ह्यांना मागणीचे आणि घटनेचे लेखी निवेदन देण्यात आले. सदर निषेध मोर्चाचे नेतृत्व ट्रायबल फोरम पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष मारुती खामकर गुरुजी, आदिवासी नेते किसन तळपे, सतू दगडे, उपसरपंच टाकवे राघोजी तळपे ह्यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ( Manipur Violence And Crime Viral Video Tribal Forum Marched To Vadgaon Tehsil Office In Maval Taluka )
यावेळी मोठ्या संख्येने मोर्चेकरी सामील झाले होते. नारायण ठाकर, बाबाजी गायकवाड, कैलास गायकवाड यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावतीने मोर्चाला पाठिंबा दिला. मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मोर्चाचे आयोजन आणि नियोजन ट्रायबल फोरम मावळ अध्यक्ष मधुकर कोकाटे, युवा ट्रायबल फोरम मावळ अध्यक्ष रविंद्र काठे, महिला ट्रायबल फोरम मावळ अध्यक्षा सारिका कोकाटे यांनी केले. निषेध सभेनंतर सर्वांचे आभार संघटनेचे सचिव भिमाजी लोटे गुरुजी आणि जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे ह्यांनी मानले. सभेचे संचालन गुलाबराव गभाले उपाध्यक्ष ट्रायबल फोरम मावळ यांनी केले.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याचे दिसत होते, तसेच त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभर संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर ही घटना ताजी असताना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. एकंदरीत महिला अत्याचाराच्या या घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. ( Manipur Violence And Crime Viral Video Tribal Forum Marched To Vadgaon Tehsil Office In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News
– हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या, खासदार श्रीरंग बारणेंची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी
– युवकांनो सावधान..! सोशल मीडिया मार्केटिंगच्या बहाण्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार