मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार ॲड. आशिष शेलार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ( Ganesh Utsav 2023 Meeting of Mumbai Municipal Officers and Ministers )
गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रुपये 1000 असलेली अनामत रक्कम कमी करून ती रुपये 100 करण्याचा महत्वाचा निर्णय मंगळवारी, 1 ऑगस्ट घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले.
हेही वाचा – उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून मिळणार पुरस्कार; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, जाणून घ्या
चिनी बनावटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी सुद्धा पाऊले उचलली जातील. या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून 3 वेळेस महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई केली जाईल. गणेशमूर्ती विसर्जनावेळी काही अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. ( Ganesh Utsav 2023 Meeting of Mumbai Municipal Officers and Ministers )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ नरेंद्र मोदी यांनी केला संकल्प
– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– ‘समृद्धी’चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त