दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी रात्री लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना चिखलसे गावाजवळ स्विफ्ट कारमध्ये अल्पवयीन मुलगी तिच्यासोबत संशयित व्यक्ती असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी याबाबत कामशेत पोलिस स्टेशनला कळवले असता कामशेत पोलिस स्टेशनकडील पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, होमगार्ड लोखंडे असे पथक लागलीच रवाना होऊन सदर गाडीचा शोध घेतला. त्यावेळी चिखलसे गावाजवळील एका सोसायटीच्या पार्किंग मध्ये स्विफ्ट कार दिसून आल्याने त्या सोसायटीत पाहिजे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता अल्पवयीन मुलगी व संशयित मिळाले.
अल्पवयीन मुलीला पळवुन आणणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष कांबळे असल्याचे आणि तो बाहेर गेल्याचे समजले, पण त्याचा मित्र ओंकार विठ्ठल रोडे (रा. वाळुंज, औरंगाबाद) याला पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तो अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस स्टेशन तसेच कोतवाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टरवरील विविध गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती मिळाली. ( minor girl kidnapped from aurangabad was rescued by kamshet police maval )
अल्पवयीन मुलीबाबत अधिक माहिती घेतली असता तिच्या वडीलांनी वाळुंज पोलीस स्टेशन, औरंगाबाद शहर इथे अगोदरच फिर्याद दाखल केल्याचे समजले. त्यानुसार वाळुंज पोलीस स्टेशन इथे संपर्क साधला. त्यानंतर सपोनि अमोल डोके व त्यांची पोलीस टीम मुलीचे वडील, मामा यांच्यासह कामशेत पोलीस स्टेशनला हजर झाले आणि सदर अल्पवयीन मुलीला, अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असे दोन्ही पुढील तपासासाठी औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. तसेच मिळून आलेला फरारी आरोपी ओंकार रोडे याला कोतवाली पोलीस स्टेशन कडील पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस , पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश घट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनकडील पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे पोलीस कॉन्स्टेबल खाडे होमगार्ड लोखंडे लोणावळा डिव्हिजन पथकाकडील पोलीस कॉन्स्टेबल तुषार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अकोलकर यांनी केली आहे. ( minor girl kidnapped from aurangabad was rescued by kamshet police maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना यादव बिनविरोध । Maval Politics
– महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road