काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने तळेगाव शहरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेढे वाटून संविधानाचा विजय साजरा करण्यात आला. मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. ( Suspension of Rahul Gandhi Sentence Congress Party Workers Celebrated By Distributing Sweets At Talegaon )
लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकारण करत असताना हेतू पुरस्सर किंवा मनामध्ये दूषित हेतू ठेवून केलेले राजकारण हे नेहमी सुजान जनतेच्या लक्षात येते व अशा राजकारणी लोकांना जनता उशिरा का होईना जागा दाखवून देते, अशी भावना मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधींचा विजय हा एकट्याचा नसून संपूर्ण भारत वासियांचा आहे पुन्हा एकदा भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये दृढ झाला असल्याची भावना ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार यांच्या पीठाने सुनावणी केली. राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता.
याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले, तालुका प्रवक्ता मिलिंद अच्युत ,तळेगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर दाभाडे, अध्यक्ष विशाल वाळुंज शहर कार्याध्यक्ष योगेश पारगे ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष ॲड निवृत्ती फलके, युवक कार्याध्यक्ष ॲड.राम शहाणे, सरचिटणीस निनाद हरपुडे, कार्यवाह दत्ता पारगे, संघटक टिकाराम सोनार, महिला उपाध्यक्ष संगीता दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Suspension of Rahul Gandhi Sentence Congress Party Workers Celebrated By Distributing Sweets At Talegaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव दाभाडे – ‘क्रीडांगणाच्या जागेत बांधकाम असल्यास तातडीने थांबवण्याचे आदेश…’
– खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा
– ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…