मोरया महिला प्रतिष्ठान च्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त वडगाव मावळ शहरातील महिला भगिनींसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप आणि हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला सुमारे अडीच ते तीन हजाराहून अधिक महिलांनी उपस्थिती दाखवली होती. वडगाव शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उपस्थितीत श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे हजारों जपनाम करण्यात आले. याप्रसंगी शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सदस्य आणि भक्तगणांचे विशेष सहकार्य लाभले. ( shree vishnu sahastranam stotra chanted in Vadgaon city in presence of thousand womens )
यावेळी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपाली गराडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, प्रमिला बाफना, पुजाताई वहिले, वैशाली कुडे, सुनिता ढोरे, सुप्रिया वाघमारे, प्रियंका खैरे, मोरया महिला प्रतिष्ठान उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जपांचा धार्मिक कार्यक्रम सरतेशेवटी हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, सदस्या आणि शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे आभार मानले. ( shree vishnu sahastranam stotra chanted in Vadgaon city in presence of thousand womens )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान
– नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप
– रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News