मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी या शाळेतील यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत खास ठरला. याचे कारण देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करत असताना अभिनेता जॅकी श्रॉफ उर्फ जग्गू दादा यांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाला जॅकी श्रॉफ उपस्थित होते, त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्यातही अतिशय उत्साहाचे वातावरण होते. ( Independence Day 2023 Flag Hoisting at Chandanwadi School by Actor Jackie Shroff )
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणी अध्यक्ष म्हणून उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा, चंदनवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. जॅकी श्रॉफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेतील असणाऱ्या अडचणी संदर्भात विचारणा केली. विद्यार्थ्यांसमवेत आणी झेंड्यासमोर ‘हर घर घर तिरंगा’ अभियान सेल्फी घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. दिलदार व्यक्तिमत्व, तळागाळातील लोकांची जाणीव असणारा सच्चा अभिनेता म्हणून गावकऱ्यांनी जॅकी श्रॉफ यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेचे मुख्याध्यापक विकास रासकर सर यांनी आणि श्रीमती अर्चना सिरसाट आणि अंगणवाडी सेविका शोभा थोरवे, जिजाबाई केवळ यांनी केले. यावेळी जेके फाउंडेशन सदस्य सचिन वाघमारे, शेट्टी साहेब उपस्थित होते. गाव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम केदारी आणि सर्व सदस्य, माता पालक गटाचे प्रमुख, तसेच ग्रामपंचायत सदस्य उर्मिला गावडे, दादाभाऊ केदारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Independence Day 2023 Flag Hoisting at Chandanwadi School by Actor Jackie Shroff )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
– अडीच हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत वडगावमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण; हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता