अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग अधिनस्त रस्त्यावरील मुलांच्या आरोग्य आहार, शिक्षण व पुनर्वसनासाठी फिरते पथक या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे आयुक्त महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त नियोजन अश्विनी कांबळे यांनी केले होते. ( Hope for the Children Foundation Pune News )
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियम 2015 च्या प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार प्रत्येक बालकाचे संरक्षण होणे गरजेचे आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग यांचा अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच या बालकांना योग्य तो आहारही देण्यात येणार आहे. शिक्षणाची गोडी लागावी म्हणून या गाडीमध्ये शिक्षक त्याचबरोबर समुपदेशक, काळजी वाहक व वाहन चालक असणार आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी फिरते पथक या विषयावरती पथनाट्य सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी मा. सह आयुक्त राहुल मोरे , जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे , होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.कॅरोलीन, होप चे व्यवस्थापक शकील शेख, सी एस आर हेड अंकिता जैन, प्रोग्रॅम हेड हेलगा थॉमस,होप चे समन्वयक ऋषिकेश डिंबळे विशाल वाघमारे राजेंद्र आहेर स्नेहल शिंदे , आनंद, दीपक कांबळे अश्विनी तसेच महिला बाल विकास विभागातील कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा