मावळ तालुक्यातील मौजे शिळींब गावात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2023-24 खरीप हंगाम अंतर्गत एस.आर.टी. भात पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील शेतीशाळा वर्ग विजय हिरेमठ (प्रकल्प संचालक,आत्मा पुणे) आणि दत्तात्रय पडवळ (मावळ तालुका कृषि अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शेतीशाळेला मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, राहुल घोगरे – बीटीएम आत्मा ह्यांनी मार्गदर्शन केले. ( Agriculture School on Rice Crop Production and Technology held in Shilimb village of Pavan Maval )
शिळींब गावात शेतीशाळेचे आतापर्यंत दोन वर्ग घेण्यात आले होते, ज्यात शेतीशाळा म्हणजे काय? भात पिक बियाणे निवड, भात बिजप्रक्रिया, गादी वाफे तयार करणे, गादी वाफ्यावर भात बियाणे आणि खते पेरणी, युरिया ब्रिकेटचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट 2023) रोजी शेतीशाळेचा तिसरा वर्ग मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर वर्गामध्ये शेतीशाळा प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मागील वर्गाचा आढावा घेण्यात आला.
सध्यास्थितीला परिसरात भात पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. भात पीक जोमदार आले आहे. भातपिकासाठी आताचा कालावधी हा महत्वपूर्ण आहे, कारण आता पडणाऱ्या पावसाने तण वाढू लागले आहे आणि कीड रोग चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शिळींब इथे घेण्यात आलेल्या शेतीशाळेमध्ये राहुल घोगरे बीटीएम – आत्मा यांनी कामगंध सापळे माहिती देऊन ते शेतात कसे लावायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी भातपिकामधील तण व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. कृषिमित्र लहू धनवे यांनी एस.आर.टी. भातउत्पादन फायदेशीर कसे याबाबत मार्गदर्शन केले. शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना शेतीशाळा कीट आणि कामगंध सापळे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे आणि अंजनवेल कृषि पर्यटन केंद्र मालक राहुल जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शेतीशाळेच्या कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, आत्मा बी.टी.एम. राहुल घोगरे, पोलीस पाटील संदीप बिडकर, प्रगतशील शेतकरी राहुल जगताप, शेतकरी अंकुश ओव्हाळ, युवा शेतकरी रोहीत केदारी, शेतकरी भाऊ ढमाले, शेतकरी संतोष शिंदे, शेतकरी नथू शिंदे, शेतकरी एकनाथ दरेकर, शेतकरी संतोष दरेकर, युवा शेतकरी शंकर दरेकर, शेतकरी भगवान दरेकर, शेतकरीगोरख गायकवाड, युवा शेतकरी सचिन शिंदे, शेतकरी दिलीप शिंदे, शेतकरी प्रकाश जगताप, शेतकरी राजू ढमाले, शेतकरी दत्तू बिडकर हे शेतकरी उपस्थित होते. शेतीशाळेच्या वर्गाचे यशस्वी आयोजन कृषिमित्र लहू धनवे आणि कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी केले होते. ( Agriculture School on Rice Crop Production and Technology held in Shilimb village of Pavan Maval )
“शेतकऱ्यांची शेतीशाळा हा उपक्रम भात पीक बियाणे निवड ते पिकाच्या कापणीपर्यंत असल्याने शेतीशाळेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यावर माहिती मिळणार असल्याने त्याचा भात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.” – दत्तात्रय पडवळ ( तालुका कृषि अधिकारी, मावळ)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा
– लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना
– टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश