व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका टाकवे - वडेश्वर गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज शुक्रवारी (दिनांक 25 ऑगस्ट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 25, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Maval-Taluka-BJP

Photo Courtesy : Jalindar Vanve


भारतीय जनता पार्टी मावळ तालुका टाकवे – वडेश्वर गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज शुक्रवारी (दिनांक 25 ऑगस्ट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये सावळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नामदेव गोंटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शरद बूट्टे पाटील आणि तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी स्वागत केले. ( Bharatiya Janata Party Maval Vidhan Sabha party entry and Worker Meet )

नामदेव गोंटे यांच्याबरोबर अनसूटे गावातील नथू मोधळे, बंडू लष्करी, राजाराम मोधळे, काळूराम शिवेकर, प्रकाश घाग, नाना मोधळे, चहादू घाग, संजू जगताप, रमेश टाकळकर, कुंडलिक मोधळे, निवृत्ती मोधळे, मुक्ताताई मोधळे इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय. देशातील जनतेच्या हिताचा विचार करत मोदी सरकार कल्याणकारी निर्णय घेत आहे. मोदीजींच्या या दूरदर्शी विचारांनी आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन युवा वर्गापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भाजपात प्रवेश करत आहेत. कारण देशातील सर्व नागरिकांना हा विश्वास आहे की देशाच्या विकासाला मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, याचं प्रेरणेतून आंदर मावळ भागातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला” अशी माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.

महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात कष्टकरी आणि शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनाही सरकारच्या या विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची माहिती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ मोफत अर्ज भरण्याची सुविधा कार्यान्वित केली असून याचा देखील नागरिकांनी लाभ घ्या, अशी माहिती मावळ भाजपा तालुका अध्यक्ष तथा भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.

कार्यकर्ता मेळाव्याला मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रामदास गाडे, यदुनाथ चोरघे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, कल्याणी ठाकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, गणेश गायकवाड, किरण राक्षे, गणेश कल्हाटकर, रोहिदास असवले, रवि शेटे, विजू टाकवे, पुंडलिक खांडभोर, अरुण कूटे, अमोल भोईरकर, विशाल भांगरे, सचिन पांगारे, इंदाराम उंडे, लक्ष्मण तळावडे, सुरेश आलम, रामदास आलम, सतीश सावंत इत्यादींसह गटातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Bharatiya Janata Party Maval Vidhan Sabha party entry and Worker Meet )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना
– Breaking! कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु
– अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?


Previous Post

पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच ‘सायन्स सिटी’ उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी

Next Post

लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Police

लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.