तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा पर्यटनस्थळी गुरुवारी (दिनांक 24) वाहून गेलेल्या दोन युवकांपैकी गायब असलेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह शनिवारी (दिनांक 26 ऑगस्ट) रोजी सापडला आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या 4 महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण गुरुवारी वाहून गेले होते. त्यातील एका युवकाचा मृतदेह शोधण्यात गुरुवारी तळेगाव दाभाडे पोलिस प्रशासन, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल यांना यश आले होते.
अनिकेत वर्मा (वय 17) असे गुरुवारी शव सापडलेल्या मुलाचे नाव होते, तर त्याच्यासोबत वाहून गेलेला अशोक गुलाब चव्हाण (वय 17, रा. चिंचवड) याचा शोध सुरु होता. अखेर दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेह आढळून आला. युवकाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले. ( Body of second youth washed away in Kundmala found talegaon dabhade news )
हेही वाचा – कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेजमधील मुले वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा इथे आले होते. त्यातील दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले होते. गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट) सकाळी साडेदहापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. तेव्हा अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. गुरुवारी अंधार झाल्यामुळे अशोक चव्हाण याची शोधमोहीम थांबविण्यात आली होती. शुक्रवारी (दिनांक 25 ऑगस्ट) पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागू शकला नाही. अखेर शनिवारी (दिनांक 26 ऑगस्ट) सकाळी शोधमोहीम सुरू केल्यानंतर अशोक चव्हाण याचा मृतदेह सापडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
– एकवीरादेवी देवस्थानच्या संचालकपदी राजकीय नेता नको – उच्च न्यायालय ; वाचा कोर्टाचे निर्देश
– वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान