“बिबट्या वैरी नाही तर शेजारी” असा संदेश देणारा प्रबोधनपर कार्यक्रम लोणावळा जवळील खोपोली शहरात आयोजित करण्यात आला होता. खोपोलीतील विहारी – ठाकूरवाडी इथे खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी (ता. रायगड) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणे” यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. ( program to raise public awareness about leopards was organized in khopoli city raigad )
काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेले बिबट्याचे दर्शन आणि त्यामुळे जनमाणसात निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी विहारी-ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांसोबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणेचे नरेश चांडक आणि सायली पिलाने यांनी संवाद साधत चर्चा केली. अत्यंत सोप्या भाषेत दृकश्राव्य माध्यमातून बिबट्याच्या बाबतीत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
बिबट्या हा वन्य आणि भटक्या प्राण्यांचीच शिकार करतो त्यामुळे मानव हा त्याची भक्ष्य नसून तो मानवाला घाबरतो, हे उदाहरणांसह पटवून दिले गेले. आपापली पाळीव जनावरे गोठ्यात बांधून ठेवावीत, परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून कुत्री आणि डुक्कर यांच्यासारखे भटके प्राणी आपल्या परिसरात वावरणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन केले गेले. बिबट्याची माहिती मिळताच घाबरून न जाता 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा अथवा वनखात्याशी संवाद साधावा अशी सूचना यावेळी देण्यात आली. त्याचसोबत उपस्थितांच्या शंकांचे निवारण देखील केले गेले.
“बिबट्या वैरी नाही शेजारी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिबट्यांच्या बाबतीत जनजागृती करण्याचा हेतू पर्यावरण पूरक असल्याचे प्रतिपादन नारायण निरगुडा आणि विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी केले. वनपाल भगवान दळवी, वनरक्षक नितीन कराडे, चंदन नागरगोजे, शीतल साळुंखे, संतोषी बस्तेवाड, राजेश्री मुसनर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, अमोल ठकेकर, प्रसाद अटक यांच्यासह अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवून वार्तालाप केला. या कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामस्थांसह महिला, युवक तसेच बालगोपाळांनी सहभाग घेतला होता. ( program to raise public awareness about leopards was organized in khopoli city raigad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – कर्णवेध संस्कार । कान का टोचले जातात? भिकबाळी का वापरावी? कर्णभुषणे महत्व व परंपरा, वाचा…
– लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, वाचा काय आहेत निर्बंध
– चांगला निर्णय! आदिवासींच्या खेळांना क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणार
– जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल