व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोणावळा परिसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 9, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala-Police

Photo Courtesy : Lonavala Police


लोणावळा परिसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येत असतात. काही पर्यटकांची स्वत:ची घरे आहेत तर काही पर्यटक भाडेतत्वावर घरे घेऊन राहतात. पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उप विभागाची गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी गुन्हे घडलेले ठिकाण, गुन्ह्याची वेळ, गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक तयार केले गेले.

novel ads

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा परिसरात आपला वावर वाढवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. उपलब्ध माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) वसीम सलाऊद्दीन चौधरी (वय २७ वर्षे रा. वाकसाई, वरसोली लोणावळा ता. मावळ जि. पुणे) हा असल्याची माहिती समोर आली. त्याला तपासकामी ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी वसीम हा उघड्या दरवाजावाटे स्लायडींग खिडकीद्वारे, घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.

चोरीचे काही गुन्ह्यात त्याचे साथीदार २) सलीम सलाऊद्दीन चौथरी (वय २९ वर्षे रा. लोणावळा ता मावळ जि पुणे) 3) शहारूख बाबू शेख (वय २९ वर्षे रा. लोणावळा ता मावळ जि पुणे) यांचा सहभाग असल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून आतापर्यंत एक तोळा वजनाची सोन्याची चैन, दोन डायमंडच्या अंगठ्या, एक सोन्याची अंगठी, दोन मोटार सायकल, रोख रक्कम असा एकूण 2,26,700 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच आला असून आरोपी वसीम चौधरी हा सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून इतर दोन आरोपींचा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

आरोपी वसीम चौधरी या आरोपीवर यापुर्वी आठ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपींकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे लोणावळा शहर पोस्टे १) ३९७/२०२३ भादंवि ३८०, २) २१४/२०२३ भादंवि ३८०, ३) १६२/२०२३ भादंवि ३८०, ४) २१३/२०२३ भादंवि ३८०, ५) २३५/२०२३ भादंवि ३७९, ६) १७८/२०२३ भादंवि ३७९, ७) २१८/२०२३ भादंवि ३७९, ८)६७/२०२३ भादंवि ४५४,३८०, ९) ७१/२०२३ भादंवि ४५४,४५७,३८० लोणावळा ग्रामीण पोस्टे – १०) ४४६/२०२३ भादंवि ४५४, ४५७,३८० इ.

24K KAR SPA ads

लोणावळा परिसरात राहणारे लोक तसेच येणारे पर्यटकांनी रात्रीचे वेळी तसेच फिरण्यासाठी बाहेर पडताना आपाआपले घरांचे दरवाजे-खिडक्या व्यवस्थित लॉक करावेत. दरवाजा-खिडकी उघडे ठेवून झोपू नये. तसेच स्लायडिंग खिडक्यांना लोखंडी ग्रिल लावावेत. सिसिटीव्ही कॅमेरे लावणेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ अंकित गोयल तसेच लोणावळा उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी आवाहन केले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल – पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक – लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, पोसई प्रदीप चौधरी, सपो प्रकाश वाघमारे, पोहवा राजु मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पोना बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, अमोल शेडगे, पोकॉ मंगेश भगत, प्राण येवले, काशिनाथ राजापूरे, पोहवा शकील शेख यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.चे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.

tata car ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – सरपंच असावा तर असा! ओझर्डे गावच्या सरपंचाने राज्यात गाजवलं तालुक्याचं नाव
– भाताचे बियाणे निघाले बोगस? मावळातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय


dainik maval ads

Previous Post

‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा

Next Post

‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Soldier-Dilip-Ozarkar-Martyred

'त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील', मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Witchcraft outside house of a NCP office bearer in Talegaon Dabhade city

तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद

August 1, 2025
Urgent measures should be taken to resolve traffic congestion at Chakan Nashik Phata meeting at Ministry

चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न

August 1, 2025
Ms-Swaminathan

भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार

August 1, 2025
Minister Chandrakant Patil

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत; …अन्यथा पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया रोखणार

August 1, 2025
GOVERNMENT OF MAHARASHTRA Mantralay

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सरकारकडून अनेक बंधने ; पाहा मार्गदर्शक सूचनांची संपूर्ण यादी

August 1, 2025
Rice-Cultivated-Maval

दैनिक मावळ विशेष : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

July 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.