मावळ तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर ह्यांच्या पार्थिवावर 5 सप्टेंबर रोजी पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ( Indian Army News Son of Maval Taluka Soldier Dilip Balasaheb Ozarkar Martyred )
शहीद दिलीप ओझरकर यांचे अंत्यसंस्कार आदी विधी झाल्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन न करता कुटुंबीयांनी ओझर्डे (ता. मावळ) येथील शेतात ती रक्षा टाकून तिथे फळझाड लावून वृक्षारोपण केले. यावेळी कुटुंबीयांनी “दिलीप नेहमी आनंदी आणि हसतमुख असत. त्याचा सदैव हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील”, अशी प्रतिक्रिया दिली.
शहीद वीर दिलीप बाळासाहेब ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर हे मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात राहतात. इथे त्यांची शेतजमीन असून ते शेती कसतात. दिलीप यांच्या जाण्याने ओझरकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. परंतू, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
दिनांक 3 सप्टेंबर रोजी कारगिल इथे देशसेवा बजावत असताना दिलीप ओझरकर हे शहीद झाले होते. पुण्याच्या भवानी पेठ इथे वास्तव्यास असलेले दिलीप ओझरकर हे 15 एप्रिल 2004 मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले होते. ते 94 मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये हलावदार या पदावर सेवेत होते. कारगिल ते लेह दरम्यान प्रवास करत असताना शत्रूने केलेल्या हल्ल्यामध्ये दिलीप ओझरकर शहीद झाले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – सरपंच असावा तर असा! ओझर्डे गावच्या सरपंचाने राज्यात गाजवलं तालुक्याचं नाव
– भाताचे बियाणे निघाले बोगस? मावळातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान
– राज्यातील शाळांसाठी परसबाग स्पर्धा; प्रथम क्रमांक आल्यास शाळेला मिळणार मोठे बक्षिस! जाणून घ्या