आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते. राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये साजरी व्हावी, याकरिता मावळ तालुका रामोशी संघटना यांच्यावतीने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन देण्यात आले होते. ह्या निवेदनाचे परिणामस्वरुप तालुक्यातील अनेक गावांत उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मावळ तालुक्यातील कोथूर्णे, वारू ब्राह्मणोली, शिवणी, नाणे मावळ, साते, पुसाणे, वराळे, खालुंब्रे, इंदुरी, तळेगांव दाभाडे, सुदुंबरे, ओव्हळे, वडगाव आदी ठिकाणी राजे उमाजी नाईक यांची जयंती नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. ब्रिटिश काळात जनतेत क्रांतीची मशाल पेटवणारे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थी आद्य क्रांतिकारक ठरतात. त्यांची जयंती मावळ तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी झाली, अशी माहिती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका संघटना चे सचिव शाम लांडगे यांनी दैनिक मावळला दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा
– राज्यातील शाळांसाठी परसबाग स्पर्धा; प्रथम क्रमांक आल्यास शाळेला मिळणार मोठे बक्षिस! जाणून घ्या
– भाताचे बियाणे निघाले बोगस? मावळातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान