तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी यांची बदली करण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पत्राद्वारे नगरविकास विभागाकडे केली आहे. ( Transfer Chief Officer of Talegaon Dabhade Municipal Council demand by MLA Sunil Shelke )
काय लिहिलंय पत्रात?
‘तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे मुख्याधिकारी पदावर एन.के.पाटील हे सध्या कार्यरत असून पाटील यांच्याबद्दल माझ्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तळेगाव दाभाडे शहरामध्ये सुमारे 80000 इतकी लोकसंख्या असून सद्यस्थितीत नगरपरिषद हद्दीमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.”
तसेच “पाणीपुरवठा तसेच मुलभूत सोयीसुविधा, आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेच्या तक्रारी घेऊन सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेमध्ये आल्यावर सदर गंभीर विषयांबाबत पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. शहरामध्ये अनेक विकासकामे सुरु असून त्या कामांच्या पूर्ततेबाबत त्यांना अनेकदा सूचना करूनही सदर विषयाबाबत ते उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांचे काम व पाटील यांची काम करण्याची पद्धत पाहता ती अत्यंत असमाधानकारक आहे. तरी अकार्यक्षम मुख्याधिकारी एन.के.पाटील यांची तातडीने बदली करण्यात यावी,” अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी पत्रात केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – सरपंच असावा तर असा! ओझर्डे गावच्या सरपंचाने राज्यात गाजवलं तालुक्याचं नाव
– मोठी बातमी! ‘छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे लवकरच भारतात आणणार’
– मावळ तालुक्यातील मनसेची प्रसिद्ध दहीहंडी फोडण्याचा मान घाटकोपरच्या राजे ग्रुपला; जिंकले 6 लाख 66 हजारांचे बक्षीस । Vadgaon Maval