मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते तथा नवलाख उंबरे गावचे आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंदर मावळ, नाणे मावळ भागात विविध विकास कामांतून आणी दांडगा जनसंपर्क यातून दत्तात्रय पडवळ यांनी तालुक्याच्या राजकारणात चांगलेच नाव कमावले आहे. तालुक्याच्या राजकारणात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ( Maval Taluka Dattatray Padwal appointed as General Secretary of Nationalist Congress Party )
दत्तात्रय पडवळ यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस पद आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशा पक्षीय पातळीवरील जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. तसेच नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, तसेच नवलाख उंब्रे गावचे आदर्श सरपंच आणि नवलाख उंबरे पार्यवरण विकास संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मावळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात.
ह्यासह, दत्तात्रय पडवळ यांनी हिरानंदानी गॅस उर्जा प्रकल्पा विरोधात केलेले आंदोलन देखील अनेकांच्या स्मरणात आहे. नवलाख उंबरे एमआयडीसी भागात शेतकरी, भुमीपुत्र यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पडवळ यांनी हिरिरीने काम केले. तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रयत्न केलेत. स्वयुंभ फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तात्रय पडवळ यांनी आजवर अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. आंदर आणि नाणे मावळ भागात त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर 2017 मध्ये पंचायत समिती निवडणूक लढवली परंतू दुर्दैवाने पराभव स्विकारावा लागला. परंतू त्यानंतरही त्यांनी त्यांचे काम सुरुच ठेवले आहे. सध्या त्यांच्याकडे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहिले जाते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त