शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना ट्रॅक्स क्रुझर ॲम्ब्युलन्स भेट – अभिमन्यु भट्टाचार्य मेमोरियल ट्रस्ट (ABMT) दिल्ली यांच्याकडून शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांना ट्रॅक्स क्रुझर ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आली. संस्थेच्या प्रमुख अनुराधा भटाचार्य व त्यांचे काही सहकारी लोणावळ्याला येऊन भेट देऊन शिवदुर्गची माहिती घेतली होती. त्यानंतर शिवदुर्गच्या कामाचे कौतुक करत अधिक चांगले काम करण्यासाठी जंगलात डोंगराळ भागात मदतकार्य पोचवण्यासाठी या ॲम्ब्युलन्सची निवड केली गेली. अभिमन्यु भट्टाचार्य मेमोरियल ट्रस्टचे पुण्यातील ट्रस्टी कर्नल कौस्तुभ शशिकांत पित्रे, पुणे यांनी ॲम्ब्युलन्स शिवदुर्गला सुपुर्द केली. ( Gift of Trax Cruiser Ambulance to Shivdurg Mitra Lonavala )
पोराला बिबट्याने पळवले, दारुड्याची अफवा आणि यंत्रणेची धावाधाव – मावळ तालुक्यातील आंबी इथे पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेली एक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. रविवारी (दिनांक 10 सप्टेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबी गावाजवळ मंगरूळ डोंगर (पिराचा डोंगर) आहे. त्या डोंगरावर रविवारी दोन मित्र फिरण्यासाठी गेले होते. त्यातील एकजण बेपत्ता झाला. त्यानंतर त्याला बिबट्याने पळवले असल्याची अफवा पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, आपदा मित्र जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु दारूच्या नशेत काही लोकांनी ही अफवा पसरवल्याचे उघडकीस आले. ( A boy is chased by a leopard, rumors of drunkenness and the system running )
सुरक्षारक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे – संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित कंपन्यांमध्ये सिक्युरिटी सेवा पुरवणारी पूना सिक्युरिटी इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे एमआयडीसी मध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा रक्षक यांनी कसा सामना करावा याचे विविध विषयांवर ट्रेनिंग झाले. वन्यजीव मावळ संस्थाचे सदस्य आणि आपदा मित्र मावळ सर्जेस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रेनिंग पार पडले. कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या दुर्घटना होतात. जसे की आग लागणे, अपघात होणे, विषारी गॅस लिकेज होणे, शॉर्ट सर्किट होणे असे अनेक अपघात होतात. ह्या अपघाताला कसे सामोरे जायचे आणि त्यासाठी काय उपाययोजना करायच्या या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. ( Disaster management lessons for security guards )
कुस्ती स्पर्धेत करुंज शाळेतील अनुष्का दहिभाते प्रथम – पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत मावळ तालुका स्तरीय फ्री स्टाइल 43 किलो वजनी गटामध्ये सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय करूंज (ता. मावळ जि. पुणे) या शाळेतील कु. अनुष्का शाईदास दहिभाते हिने प्रथम क्रमांक पटकावला. आता तिची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. ( Anushka Dahibate of Karunj School stands first in wrestling competition )
( dainik maval bulletin read all important news of maval taluka in one click )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ राष्ट्रवादीचे नेते, आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड; प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर
– सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या