पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात संतोषनगर भाम इथे भारतीय जनता पार्टी पुणे उत्तर जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा देखील पार पडला. ह्या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ( BJP pune district executive appointment ceremony concluded at santoshnagar bham in khed taluka )
भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील यांनी पुणे उत्तर जिल्हा कार्यकारणी घोषित करून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी मावळ तालुक्यातील रामदास गाडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, दत्तात्रय माळी यांची ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी, तर दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्षपदी धीरज नायडू यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र दिले गले. तसेच मावळ विधानसभा मतदार संघातील लोणावळा शहराच्या अध्यक्षपदी अरुण लाड यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशा बुचके, आंबेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख जयश्री पालांडे यांच्यासह पुणे उत्तर जिल्ह्यातील सर्व मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर
– सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या
– मरावे परी कीर्ती रूपे उरावे! दशक्रिया विधीलाही टाळ्यांचा कडकडाट – Maval News