मावळ तालुक्यातील पुसाणे गावाच्या हद्दीत ओढ्याच्या काठी बेकायदा सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सात लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पुसाने गावाच्या हद्दीत कंजारभट वस्ती शेजारी ओढाच्या कडेला मोकळ्या जागेत हा अवैध दारुचा अड्डा सुरु होता. ( Shirgaon police raided a factory making illegal Gavathi liquor )
याप्रकरणी शिरगांव परंदवडी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल समाधान लक्ष्मण फडतरे (वय 32 वर्षे) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार 25 वर्षीय आरोपी देव शिवम राठोड आणि एक महिला आरोपी (दोघेही राहणार कंजारभट वस्ती, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसाणे गावाच्या हद्दीत हा बेकायदा दारूअड्डा सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे छापा टाकला. त्यावेळी बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि साहित्य असे 7 लाख 500 रुपयांचा मुद्दे माल मिळून आला, पोलिसांनी रसायन नष्ट केले आहे. कारवाईत महिला आरोपी जागेवरच होती, तर पुरुष आरोपी पळून गेला आहे. शिरगांव पोलिसचे सपोफौ ठाकर हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न
– शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
– कुरुळी गावातील महिलांना विविध प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचा उपक्रम