व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार, ‘पीएमआरडीए’कडून अधिसुचना, लगेच वाचा…

रिंगरोडसाठीची अधिसूचना महसूल व वन विभागाचे उपसचिव सचिन कोठेकर यांनी काढली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 16, 2023
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
pune-ring-road

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम सुरू असतानाच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. रिंगरोडसाठीची अधिसूचना महसूल व वन विभागाचे उपसचिव सचिन कोठेकर यांनी काढली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( two ring roads will be constructed in pune district notification issued by PMRDA )

‘पीएमआरडीए’ने हाती घेतलेला रिंगरोड हा खेड, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्‍यातील 44 गावांमधून जाणार आहे. हा रिंगरोड कोणत्या गावांतून, कोणत्या सर्व्हेनंबरमधून जाणार आहे, तसेच त्या सर्व्हेनंबरमधील किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे, याबाबतची माहिती अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची कार्यवाही ‘एमएसआरडीसी’कडून सुरू करण्यात आली आहे.

  • ‘पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील (आरपी) रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. प्राधिकरणाकडून हद्दीचा तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यातही हा रिंगरोड दर्शवण्यात आला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून तो कागदावरच होता. आता तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार आहेत.

कसा असेल रिंग रोड?

दोन्ही रिंगरोडमधील अंतर हे पंधरा ते वीस किलोमीटर असणार आहे. रिंगरोड प्रकल्प उभारण्यापूर्वी हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास त्याचा सामाजिक परिणाम काय होऊ शकतो, याचा अभ्यास करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडसाठी ‘सामाजिक परिणाम निर्धारणा’बाबतच्या तरतुदींना कलम 10 क अन्वये सूट दिली आहे. 44 गावांमधील सुमारे एक हजार 301 सर्व्हे नंबरमधून हा रिंगरोड जाणार असून यासाठी सुमारे साडेसातशे हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

  • पुणे शहराभोवती 172 किलोमीटर रिंगरोड केला जाणार आहे. त्यासाठी आता अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1900 हेक्टर जमिनीचे संपादन केली जाणार आहे. 26 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

इथून जाणार रिंगरोड : तालुका – गावांची नावे
खेड – सोलू
हवेली – निरगुडी, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोळवडी, कदमवाकवस्ती, फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, नऱ्हे, धायरी, वडगाव खुर्द, नांदेड, शिवणे, वारजे
मुळशी – बावधन खुर्द, भूगाव, बावधन बुद्रुक, सूस, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे
मावळ – सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोदुंब्रे, धामणे, परंदवडी ( two ring roads will be constructed in pune district notification issued by PMRDA )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “मागील 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे घमंडिया”
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : ‘…एक कणभरही काम सुरु केले जाणार नाही’, पालकमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
– मोठी बातमी! गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी, वाचा काय आहे आदेश?


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Next Post

तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tree-plantation

तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.