व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड

सदर वृक्ष लागवडीसाठी महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या वतीने कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 16, 2023
in लोकल, शहर
tree-plantation

Photo Courtesy : Nilesh Garade


तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कान्हे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत स्टेशन परिसरात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष लागवडीसाठी महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या वतीने कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. ( 105 trees were planted in talegaon station area in association with Municipal Council and Mahindra Company )

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा समन्वय ज्यांनी घडवून आणला आणि ज्यांचे माध्यमातून हा उपक्रम घडवून आला असे विद्याभूषण हे सदर उपक्रमासाठी सहकुटुंब उपस्थित होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमप्रसंगी नगर परिषदेच्या वतीने ममता राठोड उपमुख्याधिकारी, सुवर्णा काळे महिला व बालकल्याण विभाग प्रमुख, जयंत मदने मिळकत विभाग प्रमुख, विशाल मिंड अतिक्रमण विभाग, प्रवीण माने आवक-जावक विभाग प्रमुख, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन उद्यान विभागामार्फत सिद्धेश्वर महाजन, उद्यान विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी रणजीत सूर्यवंशी, आकाश निंबळे व त्यांची टीम द्वारे करण्यात आले. सदर कार्यक्रम समारोप प्रसंगी शिवाजी झनझने यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना वृक्ष लागवड व संगोपन काळाची गरज असल्याचे सांगितले. “वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे” या पंक्तीस अनुसरून वृक्षांचा सुद्धा आपण आपल्या पाहुण्यांप्रमाणे आदर करावा असा संदेश आपल्या मनोगतातून दिला. नगर परिषदेचे आभार व्यक्त करत त्यांनी समारोप केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश; वाचा प्रसाद वाटप करण्याची संपूर्ण नियमावली
– “मागील 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे घमंडिया”
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : ‘…एक कणभरही काम सुरु केले जाणार नाही’, पालकमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार, ‘पीएमआरडीए’कडून अधिसुचना, लगेच वाचा…

Next Post

गणेश भक्तांना टोल माफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde

गणेश भक्तांना टोल माफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.