व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने निलंबित, ‘एफडीए’ची धडक कारवाई । FDA Action in Lonavala

मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळांचा वावर, अस्वच्छता.. कारवाईत नक्की काय आढळलं?

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 21, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
FDA Action in Lonavala Maval food licenses of four well-known hotels suspended

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” या विशेष मोहिमेअंतर्गत लोणावळा परिसरातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या कारवाईत चार नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकघर, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीत आढळले.

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १८) लोणावळा परिसरातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी केली. या वेळी चार आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही.

सर्व हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी परवान्याच्या अटी, स्वच्छता तसेच अन्न साठवणुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा अन्न परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान वलवण येथील द ऑर्किड हॉटेल येथे तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात मुदतबाह्य दुधाची पाकिटे आढळली. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवण्यात आले होते. स्वयंपाकघरात अस्वच्छता होती. तर कर्मचाऱ्यांकडेही आवश्यक संरक्षक कपडे नसल्याचे आढळले.

रिदम लोणावळा या हॉटेलच्या मुख्य स्वयंपाकघर आणि बेकरी विभागातील फ्रीजजवळ झुरळांचा वावर आढळला. शाकाहारी, मांसाहारी, कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ स्वतंत्रपणे साठवले जात नव्हते. अन्नपदार्थांच्या पाकिटांवर आवश्यक लेबल लावलेले नव्हते. तसेच फ्रीजमधील साहित्य आणि परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे तपासणीत दिसून आले.

जुना पुणे-मुंबई महामार्गावरील बेसिलिका हॉटेलमध्ये देखील कोल्ड स्टोरेजमध्ये मुदतबाह्य झालेले चीज आणि ब्रेडचे प्रकार आढळले. हे पदार्थ एफडीएच्या पथकाने नष्ट केले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र कप्पे, भांडी आणि फ्रीजची व्यवस्था नव्हती. स्वयंपाकघरात खाद्य रंग आणि अजिनोमोटोचा वापर होत असल्याचे आढळले. मात्र, मेनू कार्डवर त्याबाबत माहिती नमूद केलेली नव्हती. याशिवाय कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, पेस्ट कंट्रोल अहवाल आणि वापरलेल्या तेलासंदर्भातील नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले.

तर, द फर्न हॉटेल येथे बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी मुदतबाह्य खाद्य रंगांचा वापर होत असल्याचे आढळले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
– वाकसई – सदापूर रोड येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदूराष्ट्र सेना व स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन
– हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त; ९ नमुन्यांचा अहवाल येणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

FDA Action in Lonavala Maval food licenses of four well-known hotels suspended

मोठी बातमी! लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने निलंबित, ‘एफडीए’ची धडक कारवाई । FDA Action in Lonavala

November 21, 2026
FDA Conducts Inspection at D-Mart in Maval Taluka Pune

मावळमधील डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त; ९ नमुन्यांचा अहवाल येणार

November 21, 2026
Implement comprehensive measures regarding infrastructure transportation and encroachments in Talegaon-Chakan area said District Collector Jitendra Dudi

तळेगाव – चाकण परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 20, 2026
Paragliding adventure sport in Kamshet to continue efforts by MP Shrirang Barne prove successful

कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2026
Protest by Hindu Rashtra Sena demanding demolition of an unauthorized construction on Waksai Sadapur Road

वाकसई – सदापूर रोड येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदूराष्ट्र सेना व स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन

November 19, 2026
Balasaheb Jadhav elected as Chairman of Shivali Society Maval Ravindra Bhegade congratulations

शिवली सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब जाधव यांची निवड; रविंद्र भेगडे यांच्याकडून अभिनंदन

November 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.