केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिनांक 16 सप्टेंबर ते 2 आक्टोबर २०२३ दरम्यान ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी (दिनांक 16 सप्टेंबर) कचरा मुक्त शहराच्या उद्देशाने ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा नगर परिषदही या उपक्रमात सहभागी होत असून, नागरिकांनाही सहभागी होण्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आवाहन केले आहे.
‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत शनिवारी खंडाळा तलाव व सहारा पूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, त्यानंतर जनजागृती रॅली निघणार आहे. शहरातील नागरिक, युवक, युवती, बचत गट, सामाजिक संघटनांनी शहराच्या ‘लोणावळा स्वच्छता लिजेंडस’ या टीममध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे व शहर स्वच्छ राखण्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ( indian cleanliness league in lonavala city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार, ‘पीएमआरडीए’कडून अधिसुचना, लगेच वाचा…
– मोठी बातमी! घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह
– गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश; वाचा प्रसाद वाटप करण्याची संपूर्ण नियमावली