श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ग्रामीण मोठ्या गटात भाजेगाव येथील शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय तर शहरी गटात येथील आदर्श विद्यामंदिरने विजेतेपद पटकावले. तर, लहान गटात भोयरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शहरी गटात लोणावळ्यातील रायवूड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवले. ( schools from bhoyre lonavala bhajegaon and talegaon dabhade succeed in patriotic group singing competition )
गटनिहाय विजेते संघ पुढीलप्रमाणे :
लहान गट
प्रथम क्रमांक : जि. प. प्राथमिक शाळा भोयरे (ग्रामीण) आणि रायवूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा (शहरी)
द्वितीय क्रमांक : पवना विद्यामंदिर पवनानगर आणि आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे.
तृतीय क्रमांक : जि. प. प्राथमिक शाळा ताजे आणि स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे.
मोठा गट
प्रथम क्रमांक : शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजेगाव आणि आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे.
द्वितीय क्रमांक : पवना विद्यामंदिर पवनानगर आणि नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे.
तृतीय क्रमांक : प्रगती विद्यामंदिर इंदोरी आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल लोणावळा.
पारितोषिक वितरण समारंभात गीतरामायण सादरकर्ते शाहीर श्रीगुरुप्रसाद नानिवडेकर, संगीत विशारद मिलिंद दलाल, शिल्पा आठल्ये, शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, सचिव मिलिंद शेलार, रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल खळदे, सुनील भोंगडे, सुनील खोल्लम, सचिन कोळवणकर, संदीप मगर, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना गौरविण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सुनीता खोबरे व सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…
– शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’