इनर व्हील क्लब तळेगाव दाभाडे तर्फे संपर्क बालग्राम, भाजे (ता. मावळ) येथील 8 वी ते डिग्रीच्या विद्यार्थिनींना करिअर विषयक मार्गदर्शन दिले गेले. अनाथ, वंचित, रेड एरिया मधील महिलांच्या मुलींच्या शिक्षणाकरिता संपर्क बालग्राम ही संस्था सन 1989 पासून कार्यरत आहे. शेकडो मुली या संस्थेत शिक्षण घेत आहेत.
या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील वेगवेगळ्या करिअरच्या संधींबद्दल समाजसेवक अजय गायकवाड ओळख करून दिली आणि मार्गदर्शन केले. मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. इनरव्हील मेंबर नवनीता चटर्जी यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. अत्यंत सुयोग्य आणि मौलिक असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना दिले गेले, असे क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यावेळी म्हणाल्या.
यावेळी अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, खजिनदार भाग्यश्री काळे, नवनिता चॅटर्जी, शलाका वालिया व स्नेहल निंबाळकर उपस्थित होत्या. एकूण 130 विद्यार्थिनी उपक्रमाचा लाभ घेतला. ( career guidance to students of sampark balgram at bhaje )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…