गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे श्री गणेशाच्या आगनमासोबत दोन दिवसांनी येणाऱ्या गंगा-गौरी. महाराष्ट्रात जसा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो, अगदी तसाच गौरीचा सणही साजरा होतो. गौरी मातेचे, आगमन, पुजन आणि विसर्जन सोहळाही दिमाखात होत असतो. मावळ तालुक्यात गुरुवारी ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने गौरी मातेचा आगमन सोहळा झाला.
मंगळवारी (दि. 19 सप्टेंबर) रोजी भाद्रपद चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर बुधवारी ऋषीपंचमी आणि गुरुवारी (दि. 21 सप्टेंबर) रोजी गौरी मातेचे आगमन झाले. गणेशापाठोपाठ गौरी माता तीन दिवसांसाठी सासराहून माहेरी आली. तिच्या ह्या आगमनाचा पारंपारिक पद्धतीने सोहळा मावळ तालुक्यातील गाव शिवारात ठिकठिकाणी पाहायला मिळाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गौरीचा सण हा महिला वर्गासाठी अत्यंत खास सण. गौरीची सजावट, त्यांची पुजा अर्चा, नैवद्य, गौरीपुढे होणारे पारंपारिक खेळ, हळदी-कुंकू अशा अनेक गोष्टींमुळे गौरीचा सण अत्यंत खास ठरतो. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात गावाजवळील पाणवठ्यावर गौरीसाठी लागणारी फुले, लव्हाळ आदी वस्तू नेऊत त्या धुवून पुन्हा पुजाविधी करुन घरी आणणे, असा गौरी आगमनाचा सोहळा असतो. ढोल ताशांच्या गजरात हे आगमन गुरुवारी झाले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश
– ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill
– तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी