व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill

लोकसभेत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
indian-parliament

File Image - India New Parliament


लोकसभेत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात दोन मते पडली. चिठ्ठीद्वारे मतदान होऊन हे विधेयक मंजूर झाले आहे. मोदी सरकारचे ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. ( Narendra Modi Government Women Reservation Bill 2023 Passed In Loksabha )

नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्वच पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे विधेयक मंजूर होईल यात कुणालाही शंका नव्हती. चिठ्ठीद्वारे या विधेयकाबाबत मतदान घेण्यात आले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले असल्याने आता ते राज्यसभेत मांडले जाईल. राज्यसभेत एनडीएचे बहुमत असल्याने तिथेही विधेयक मंजूर होण्यास काही अडचण येणार नाही.

  • नारी शक्ती वंदन विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली, तेव्हा विधेयकाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. महिला आरक्षण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न असल्याचं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. दुसरीकडे, भाजपने महिला आरक्षण आंदोलनाचे श्रेय गीता बॅनर्जी आणि सुषमा स्वराज यांना दिले.

महिला आरक्षण कायदा पास झाल्यावर काय होणार?

विधेयक मंजूर झाल्याने आता लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण असेल. राज्यसभा आणि विधानपरिषदेमध्ये हे आरक्षण दिले जाणार नाही. तसेच या कायद्याचा लाभ महिलांना लगेच मिळणार नाही. 2026 नंतर नारी शक्ती वंदन कायदा लागू होईल. त्यानंतर महिलांना आरक्षण मिळण्यास सुरुवात होईल. देशातील महिलांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून राजकारणातील त्यांचे प्रतिनिधित्व आणि सहभाग वाढणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’
– गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी मिळावी – आमदार शेळके
– ‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी

Next Post

अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar-Sunil-Shelke

अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.