पीएमआरडीए हद्दीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांमधील रहिवाशांना बिल्डर्सकडुन आश्वासन दिल्याप्रमाणे मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. तरी देखील अशा गृहप्रकल्पांना ‘पूर्णत्वाचा दाखला’ कसा काय दिला जातो, अशी लक्षवेधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (दिनांक 16 मार्च 2023) मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथे बैठक संपन्न झाली.
आपल्या मावळ तालुक्यात मोठेमोठे गृहप्रकल्प, टाऊनशिप, सोसायट्या उभारल्या जात आहेत. संबंधित बिल्डर्सकडुन रहिवाशांना रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था इत्यादी सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतू प्रत्यक्षात अनेक ठिकाणी येथील नागरिकांची सुविधांअभावी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत. तसेच या गृहप्रकल्पांमधील सांडपाणी थेट इंद्रायणी व पवना नदीपात्रात सोडले जाते. तरी देखील अशा प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला मिळत असल्याने सदनिकाधारकांना बिल्डर्स जुमानत नाहीत आणि त्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पीएमआरडीएसह संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर
पुणे इथे झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांकडून समस्या जाणून घेण्यात येतील व ज्या विकसकांकडून रहिवाशांना मूलभूत सुविधा दिल्या जात नसतील. त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मंजूर करुन घेतलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे पूर्ण काम झाल्यानंतरच सदर गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
‘ह्या निर्णयामुळे मावळातील अशा समस्याधारक रहिवाशांना नक्कीच न्याय मिळणार आहे.’ – आमदार सुनिल शेळके
सदर बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासह पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीए नगररचना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ( There will be direct inspection of housing projects in Maval taluka said mla sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन
– निगडे सोसायटी ठरली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सोसायटी; सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पारितोषिक
– वडगावमध्ये भाजपाकडून ‘अटल आरोग्य’ अभियानाचा शुभारंभ; शहरातील 5 हजार नागरिकांना देणार आरोग्य कीट