भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत “सेवा पंधरवडा” अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुषंगाने रविवारी (दिनांक 17 सप्टेंबर) रोजी वडगाव मावळ शहरातील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा अंतर्गत वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने “अटल आरोग्य अभियान”चा शुभारंभ करण्यात आला.
“अटल आरोग्य अभियान” अंतर्गत वडगाव शहरातील 5 हजार नागरिकांना प्रथमोपचार आरोग्य कीटचे वाटप केले जाणार आहे. आज प्राथमिक स्वरूपात 25 आरोग्य कीटचे वाटप करून नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला गेला. ( Atal Arogya Abhiyaan launched by BJP in Vadgaon Maval )
ह्यावेळी श्री पोटोबा महाराज देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, भाजपा मावळ तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, सोपानराव ढोरे, माजी पं.स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, सेवा पंधरवडा अभियान संयोजक यदुनाथ चोरघे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, बंडोपंत भेगडे, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, नगरसेवक भूषण मुथा, रविंद्र म्हाळसकर, एकनाथ पोटफोडे, वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांच्यासह वडगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी
– मावळच्या सुपुत्राची यशस्वी कामगिरी! उर्से गावातील नवनीत ठाकूर याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड
– शिंदे सरकारचे एकापेक्षा एक जबरदस्त निर्णय! फक्त मराठवाडा नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर