गुजरात इथे झालेल्या ऑल इंडिया रायफल शूटिंग स्पर्धेत आणि महू येथे झालेल्या ऑल इंडिया जी. व्हि. मांवळणकर ज्युनिअर रायफल शूटिंग स्पर्धेत नवनीत ठाकूर याने नेत्रदीप कामगिरी केली. पन्नास मीटर प्रोन रायफल ज्युनिअर गटामध्ये नवनीत ठाकूर याने 600 पैकी 562 गुण संपादन करून यशस्वी कामगिरी केली. ह्या कामगिरीच्या जोरावर नवनीत ठाकूर ह्याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड झाली आहे. ( Navneet Thakur from Maval taluka was selected in national rifle shooting competition )
नवनीत ठाकूर हा ऊर्से येथील रहिवासी असून रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये त्याने यापूर्वीही राज्य पातळीवर विशेष गुण संपादन करून ग्रामीण भागातील तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याची आता ज्युनिअर राष्ट्रीय रायफल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नवनीत ठाकूर याला प्रशिक्षक म्हणून स्नेहल राज दाभाडे आणि राज सुधीर दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच दर्शन दिलीप लोंढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड
– भाजे येथील संपर्क बालग्राममधील विद्यार्थिनींना करिअर विषयक मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा उपक्रम
– देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धेत भोयरे, लोणावळा, भाजेगाव आणि तळेगाव दाभाडे येथील शाळांना यश । Maval Taluka News