व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणेशोत्सव काळात जुगार खेळणाऱ्यांनो सावधान! IPS सत्यसाई कार्तिक यांची वडगावमधील जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची वडगाव इथे जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 18, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
raid-on-gambling-den

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ : वडगाव मावळ गावच्या हद्दीत आंबेडकर कॉलनी इथे पत्राच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळत आहेत, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास वडगाव मावळ गावच्या हद्दीत आंबेडकर नगरमधील पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये छापा टाकवा.

त्यावेळी 1. दिनेश सौदानसिंग चौहान (वय 32 वर्षे, रा. आंबेडकरनगर, वडगाव मावळ) 2. राजेश मारुती तरस (वय 43 वर्षे रा. किवळे ता.हवेली) 3. अंकुश अशोक सुरवडे (वय 33 वर्षे, रा. आंबेडकर नगर वडगाव मावळ) 4. नंदकुमार ढोरे (वय 57, रा. वडगाव मावळ) 5. अविनाश बाळू काजळे (वय. 31 वर्षे रा. नायगाव ता. मावळ) 6. रोहित अशोक ढोरे (वय 24 वर्ष, रा. वडगाव मावळ) 7. अजय कैलास दवणे (वय 27 वर्षे, रा. माऊ ता. मावळ) 8. सागर भानुदास जांभळे (वय 32, रा. माऊ, ता. मावळ) आणि 9. गजानन भिमा बाळशंकर (वय 40, रा. तळेगाव स्टेशन ता. मावळ) ह्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी छापा टाकला असता हे सर्वजण जुगार खेळता आढळून आले. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता तिथे पत्ते खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहने असा एकूण 6,41,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( IPS Satyasai Karthik raid on gambling den in Vadgaon Maval )

ह्या कारवाईत आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या समवेच पो.ह.वा. नायकुडे, पो.शि. शिंदे, पो.शि. पवार, पो.ह.वा. संजय सुपे, पो.ना. शशिकांत खोपडे, पो.कॉ. अंकुश पाटील यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास म॑. पो.स.ई. आर.आर.मोहिते करत आहेत. आगामी गणेशोत्सव काळात गणपती मंडळातील सदस्य कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा बेकायदेशीर अवैध धंदे करणार नाहीत याबाबत सत्यसाई कार्तिक यांनी सुचना दिली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळच्या सुपुत्राची यशस्वी कामगिरी! उर्से गावातील नवनीत ठाकूर याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड
– शिंदे सरकारचे एकापेक्षा एक जबरदस्त निर्णय! फक्त मराठवाडा नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– वनविभागाकडून मौजे बोरवली गावात वनराई बंधाऱ्याची निर्मिती; वनराई बंधारा म्हणजे काय? समजून घ्या


Previous Post

“आपला व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर मेहनत, कष्ट आणि प्रशिक्षणाची गरज असतेच” – सुमित वाडेकर

Next Post

वडगावमध्ये भाजपाकडून ‘अटल आरोग्य’ अभियानाचा शुभारंभ; शहरातील 5 हजार नागरिकांना देणार आरोग्य कीट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-bjp

वडगावमध्ये भाजपाकडून 'अटल आरोग्य' अभियानाचा शुभारंभ; शहरातील 5 हजार नागरिकांना देणार आरोग्य कीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.