मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन इथे काल-परवा एक अमानवीय घटना घडली. एका 12 वर्षीय मुलीवर बला’त्कार करण्यात आला. त्या नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटल्यावर रक्तस्त्राव चालू असताना सदर मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीची याचना करत होती. त्यावेळी लोकांनी बघ्याची भूमिका घेत त्यावर काहीच मदत न केल्याचा आरोप सध्या होतोय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ( Ujjain rape case Our society has become inhuman Prakash Ambedkar )
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आपला समाज सध्या अमानवीय झाला आहे! समाजाने इथल्या स्त्रीवर दोनदा आघात केले. एक, जेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले आणि मांसाच्या तुकड्यासारखे फेकले गेले आणि दुसरं, जेव्हा ती एका दारातून दुसऱ्या दारात गेली तेव्हा लोकांनी तिला हाकलून दिले. रक्तस्त्राव चालू असतांना, ती अर्धनग्न अवस्थेत, ती मदतीची याचना करत होती. त्या 12 वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर ह्या वर्तनाचा किती आघात झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. दोषी फक्त भाजपशासित सरकार नाही, तर इथली जनता आहे. ज्याने ती मदत मागत असतांना तिला मदतीचा हात नाकारला. या घटनेवर आपला समाज हा अमानवीय झाला आहे.” असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी घटनेवरील भूमिका आणि मत व्यक्त केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात आता 24 तास असणार उजेड; रात्रीच्या अंधारातही गावकऱ्यांच्या पायवाटा उजाळणार
– आजपासून पितृपक्षाचा प्रारंभ! पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र