तिकोणा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तिकोणा ग्रामपंचायतचे मावळते उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने पदाचा राजीनामा सरपंच ताराबाई रघुनाथ बोडके यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच ताराबाई बोडके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय तिकोणा इथे विशेष सभा मंगळवारी (दि. 3 ऑक्टोबर) घेण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी दिलेल्या वेळेत स्वप्नील ज्ञानेश्वर तुपे आणि सुरेश लक्ष्मण मोहोळ यांचे उपसरपंच पदासाठी अर्ज आले. त्यामुळे मतदान घ्यावे लागले. यावेळी एकूण सदस्य 7 पैकी स्वप्नील तुपे यांना 4 मते तर सुरेश मोहोळ यांना 3 मते मिळाली. त्यामुळे स्वप्नील तुपे यांची बहुमताने उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले.
स्वप्नील तुपे यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. यावेळी नवनियुक्त उपसरपंच तुपे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अनंत वरवे, अनंता खैरे पोलिस पाटील, राम मोहोळ, रमेश शिर्के, निळू शिंदे, वसंत बोडके, नारायण बोडके, अनंत मोहोळ, अर्जून कदम, किरण बोडके, शरद साळुंके (भाजपा) आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Swapnil Tupe Elected Unopposed Deputy Sarpanch Of Tikona Gram Panchayat Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– ब्रेकिंग! महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर
– ‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News