व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल

'अकार्यक्षम मुख्याधिकारी ज्यांनी शहरात आणला, ते शहराच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत' आमदार सुनिल शेळके यांचा खासदार बारणे यांच्यावर थेट आरोप.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
sunil-shelke-shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सध्या सुरु असलेल्या भोंगळ कारभारावरुन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि स्थानिक नेते यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत. त्यांनी तळेगावच्या जनतेला उत्तर द्यावं,’ असा थेट ‘बाण’ आमदार सुनिल शेळके यांनी सोडला आहे. मागील काही महिन्यांपासून तळेगाव नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागील सहा महिन्यांपासून शहरातील कचरा, स्वच्छता, पाणी पुरवठ्यावरुन नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहेत. ( Talegaon Dabhade Municipal Council CEO N K Patil MLA Sunil Shelke MP Shrirang Barne Politics )

“सध्याचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांच्यावर कार्यपद्धतीवर नागरिकांची तीव्र नाराजी असून मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनतेच्या मुलभुत प्रश्नांविषयी कुठलेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. अजून दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना काहींनी स्वतःसाठी आणलेला अकार्यक्षम मुख्याधिकारी तळेगाव शहरातील कचरा, रस्ता, पाणी असा एकही प्रश्न सोडवू शकला नाही. त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे का?” असा सवाल आमदार सुनिल शेळके यांनी केला.

“मागील तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. निधी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक बंद ठेवली आहेत. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बिल ठेकेदाराला दिले जात नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक मुख्याधिकारी आले, प्रशासक आले. विजय सरनाईक यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक राजकारण करुन एन. के. पाटील सारख्या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्याला नगरपरिषदेत कुणी आणले. ज्यांनी असा अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला ते खासदार श्रीरंग बारणे आणि ज्यांच्या सांगण्यावरून आणला ते स्थानिक नेते तळेगाव शहराच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत,” असा आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.

“आमच्या समस्यांकडे आमदारांनी लक्ष द्यावे, अशी सुचना शहरातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या सुचनेचा आदर करतो. सध्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही. नगरपरिषदेकडे कर भरुन देखील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मी स्वतः मागील दहा महिन्यांपासून नगरपरिषदेत पाऊल ठेवले नाही. शहरातील असे गलिच्छ राजकारण थांबवण्यासाठी जनतेनी देखील साथ देणे गरजेचे आहे,” असे मत आमदार सुनिल शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकात मांडले आहे आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर
– सिनेक्रॉन कंपनीच्या व्यवस्थापिका मेयांग आणि अँटोनिया मेनेटा यांचे वडगावात खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत
– दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा


dainik maval jahirat

Previous Post

तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड । Gram Panchayat Election

Next Post

डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
DJ-laser-light-Pune

डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.