व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 03 ऑक्टोबर) मुंबईत पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
CM-Eknath-Shinde

Photo Courtesy : FB / CMO Maharashtra


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 03 ऑक्टोबर) मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी देखील राज्य सरकारने दिवाळीला नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा आनंदाचा शिधा देताना त्यात मैदा आणि पोहे यांचाही समावेश असणार आहे, त्यामुळे सामन्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात;

  1. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
  2. विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
  3. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
  4. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. 45 पदांनाही मंजुरी.
  5. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा.
  • गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना 90 टक्के शासन अनुदान.

सोयाबिन पिकाबाबत महत्वाचे निर्देश : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

अजित पवार बैठकीला अनुपस्थित : राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक ही राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीविना पार पडली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी अजित पवार यांची तब्येत ठिक नसल्याचे सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘पावसाची संततधार, दाट धुके, गडद अंधार आणि शेवाळलेल्या पायवाटा… अशा सर्व अडचणींवर मात करुन 6 जीव वाचवले’
– दुःखद! मावळ भाजपाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव घारे यांचे निधन
– करुंज ग्रुप ग्रामपंचायतीमधील 25 आदिवासी (कातकरी) बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप


Previous Post

आदर्श शिक्षक तथा प्रसिद्ध पत्रकार भारत काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

सिनेक्रॉन कंपनीच्या व्यवस्थापिका मेयांग आणि अँटोनिया मेनेटा यांचे वडगावात खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Meyang-Antonia-Meneta

सिनेक्रॉन कंपनीच्या व्यवस्थापिका मेयांग आणि अँटोनिया मेनेटा यांचे वडगावात खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.