कामशेत : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून करुंज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत राऊतवाडी येथील वस्तीवर जाऊन 25 कातकरी बांधवांना मोफत जातीच्या दाखल्यांचे वाटप (सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर) करण्यात आले. ( Distribution of caste certificate to 25 tribal Katkari peoples in Karunj Group Gram Panchayat )
कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन जातीचे दाखले मोफत वाटप करण्यात येत आहे. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार शेळके यांचे स्वीय सहाय्यक सचिन वामन, अशोक राऊत, शाम लोखंडे, संतोष लगड, उमेश लगड, विष्णु लोखंडे, संतोष जाधव, रुपेश सोनुने, नबिलाल आत्तार आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार
– चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरण परिसराच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन
– लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला । Lonavala News