सन 1942 ला महात्मा गांधीजी यांनी इंग्रजांना भारत छोडो हा संदेश देताना, भारतीयांना अहिंसा आणि सत्याग्रह हा मंत्र देऊन “करो या मरो” हा निर्वाणीचा संदेश दिला. जेव्हा दुसरे महायुध्द संपले होते, तेव्हा ह्या युध्दात अनेक विनाशक शस्त्रे वापरली गेली होती. त्यामुळे जगात अनेक प्रकारचे नवनवीन रोग निर्माण झाले होते. अनेक साथीच्या रोगाने माणसे मरत होती. सरकारला ही परिस्थिती हाताळणे शक्य होत नव्हते.
भारतात या काळात टी.बी., कुष्ठरोगासारखे रोग मोठ्या प्रमाणात पसरत होते. महायुध्दाचा परिणाम अन्नधान्य व हवामान यावर झाला होता. वैद्यकीय सेवा पुरविणारी यंत्रणा अपुरी पडत होती. दळणवळणाची साधने ही आपुरी होती. ग्रामीण भागात त्यामुळे गैरसोयी निर्माण झाल्या होत्या. टी.बी. सारख्या रोगासंबंधी अनेक गैरसमजूती लोकामध्ये होत्या. हा रोग संसर्गजन्य आहे, या समजूतीने अनेक रोग्यांना उपचाराविना सोडून देण्यात येत होते.
- त्यामुळे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी ग्रामीण भागात काम करण्याचे ठरवले. मावळचे हवामान हे शुध्द आणि हवेशीर असल्याने त्यानी यासाठी तळेगांव हे ठिकाण निवडले. तळेगांवातील अनेकांचे सहकार्य त्यांना लाभले. त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली. डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कन्व्हॅलेसंट होमची स्थापना तळेगांव मध्ये 1925 साली केली. (या डॉ. सरदेसाई यांनी समाधी ही जनरल हॉस्पिटलच मध्ये बांधण्यात आली होती. चाकण रस्ता रुंदीकरणामुळे ती हलवण्यात आली)
काळाची गरज ओळखून डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी टीबी सॅनेटोरियम सुरू केले. टीबी रुग्ण लवकर बरे होण्यासाठी अनेक डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. अत्यंत कमी कालावधीत हे तळेगांवचे टीबी सॅनिटोरियम भारतभर प्रसिद्ध झाले. तेव्हा भारतातील प्रमुख नेत्यांनी व सरकारनेही तळेगांवची नोंद घेतली.
‘स्वातंत्र लढ्यात व्यस्त असतानाही महात्मा गांधी यांनी मानवतेच्या या मंदिरास सन 1946 साली भेट दिली येथे मुक्काम केला. स्वत: रुग्णांची विचारपूस केली. त्या मुळे तळेगांवला सेवा क्षेत्रात एक महत्वाची ओळख प्राप्त झाली. त्या काळात भारतात टी.बी. रुग्णांसाठी काम करण्याऱ्या मोजक्यांच हॉस्पिटल मध्ये तळेगांव हे प्रमुख होते हे विशेष. महात्मा गांधी स्वत: येथे आल्यामुळे या रोगाविषयी असलेले गैरसमज कमी झाले.
आज हॉस्पिटलच्या आवारात “गांधी ची झोपडी” नावाने जागा आहे. सर्वांनी त्या ठिकाणी आर्वजून भेट दिली पाहिजे. शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहलीसाठी नेले पाहिजे. काळाच्या ओघात टी.बी. रोगावर औषधे उपलब्ध झाली. टी.बी. रोग जगातून हदृपार झाला. त्यामुळे टी.बी. साठी ओळखली जाणारी हॉस्पिटल रुग्णालये ही लोकांच्या विसमरणात गेली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
परंतू Talegon General Hospital आणि Convalescent Home हे केवळ T.B साठीच नाही. रूग्ण आणि नेत्र रूग्ण प्रत्येक स्तरावर सामान्य सेवा पुरवत असल्याने 1995 मध्ये तळेगाव सामान्य रुग्णालयाने MIMER सोबत सहकार्य केले आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय स्थापन केले. त्यानंतर तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कन्व्हॅलेसंट होम्स व्यवस्थापनाने नर्सिंग आणि आय स्पेशालिटी हॉस्पिटलची ट्रेनिंग स्कूल सुरू केली.
मावळ तालुक्यातील तळेगांव मधील सेवाकार्यांची नोंद राष्ट्रपित्यांने घेऊन या कार्याला दाद देण्यासाठी स्वत: भेट देणे हा प्रसंग मावळकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. महात्मा गांधी आणि तळेगांव यांचे नाते 1927 पासून आहे. समर्थ विद्यालयाचे विजापूरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण मार्च 1927 मध्ये गांधींजींच्या हस्ते झाले होते. या सर्वांची नोंद Day to Day with Gandhi या महादेव गांधी लिखीत ख्ंडात दिलेली आहे. ह्या आणि इतर माहितीच्या आधारे जाणकारांकडून सर्व माहिती अभ्यासून “तळेगांव आणि मा. गांधी संबंध” यावर एक पुस्तक प्रकाशित केले पाहिजे.
आज नव्या पिढीला या आपल्या परंपरेचा विसर पडला आहे. या घटनेचे कायमस्वरुपी स्मरण राहण्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. सरदेसाई पुतळा तळेगांव चौकात उभा करण्यात आला पाहिजे किंवा एखादे मोठे स्मारक उभे केले पाहिजे. जेणे करुन डॉ सरदेसाई आणि त्यांचे सहकारी यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्य लोकांना होत राहील. तळेगांव नगरपालिकेने याबाबत पुढाकार घ्यावा आणि या ऐतिहासिक घटनेचे स्मारक तळेगांव लवकर उभे करावे, ही या गांधी जंयती निमित्त अपेक्षा.
लेखक – अजित देशपांडे (संतविचार अध्यासन)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरण परिसराच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन
– लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला । Lonavala News
– ‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे