यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित साते यांची 28 वी वार्षिक सभा संस्था कार्यालयात संपन्न झाली. ‘पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे,’ असे प्रतिपादन यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भाऊसाहेब आगळमे यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमात स्पर्धा परिक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर विराजमान झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार करण्यात आला. ( Maval taluka youth who passed PSI in MPSC examination felicitated )
पोलिस उपनिरीक्षक पदावर संधी मिळालेली अश्विनी गाडे व श्रुती मालपोटे तसेच पोलिस हवालदार सानिका काजळे, संतोष लोंढे, नागेश मोहिते, अभिषेक काजळे, ओंकार भुंडे, स्वप्निल पवार, विक्रम जांभूळकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे तुकाराम असवले उपस्थित होते.
तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष नारायण ठाकर, बंडोबा मालपोटे, साते ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर आगळमे, टाकवेचे उपसरपंच ॠषीनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदिप शिंदे उपस्थित होते. पुढे बोलताना आगळमे म्हणाले की, ‘राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, असे असताना शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे धोरण पतसंस्थांनी स्विकारले होते. नोटबंदीच्या काळात पतसंस्थेचे आधार देण्याचे काम केले. ठेवीच्या सुरक्षेला महत्व देणे गरजेचे असल्याचे नमुद केले.’
तुकाराम असवले म्हणाले की, ‘नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील चांगले काम करणारी पतसंस्था असून व सर्वांनी एकत्र येऊन पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे.’ नारायण ठाकर म्हणाले की, ‘मावळ तालुक्यातील सहकार चळवळीला बळ देत एका उंचीवर नेले आहे. चांगले काम करणाऱ्या संस्था चालकांचे कौतुक करणे आपले कर्तव्य ठरते. त्यातुन चालकांना उभारी मिळून आणखी प्रगती होण्यास हातभार लागतो.’ मावळ तालुक्यातील गावात पैशांची व विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संस्थेचे नामदेव गाभणे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. भारत काळे यांनी सुत्रसंचालन केले, तर संचालक पतसंस्थेचे सी.ई.ओ यांनी स्वागत केले. संभाजी बोऱ्हाडे सर यांनी आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन
– लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण