मावळ तालुक्यातील चावसर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे ( Morve Village Zilla Parishad Primary School ) येथे हस्तकलेचे विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मोरवे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी मंगळवार (18 ऑक्टोबर) रोजी गावातील विविध कलागुण संपन्न असलेले माऊली गायकवाड यांना बोलावून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बांबूपासून टोपली विणकामाचा अनुभव करुन दिला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माऊली गायकवाड यांनी ओल्या बांबूपासून टोपली विणकाम कसे केले जाते, याची माहिती देत प्रत्यक्षात टोपली विणकाम करुन दाखवले. यासाठी लागणारे साहित्य, कालावधी आणि उपयोग याचीही माहिती दिली. ( Basket Making Training To Morve Village ZP School Students )
ग्रामीण भागातील विविध हस्तकला लोप पावत चालल्या असल्यामुळे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात अनुभव देणे गरजेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी मत व्यक्त केले. तर यावेळी शिक्षक शरद शिंदे यांनी प्लॅस्टिकच्या वस्तू वाटण्याऐवजी हातविणकाम केलेल्या वस्तू वापराव्यात असे मत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने माऊली गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अधिक वाचा –
– तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वेहेरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डंका
– माळवाडी येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न, आमदार शेळकेंसह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वाटप
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग